Translate

Wednesday 7 October 2015

नवोपक्रम कार्यशाळा नाशिक👬

👭नवोपक्रम कार्यशाळा नाशिक👬

        📝  ज्ञानदेव नवसरे
www.dnyanvahak.blogspot.in

नमस्कार मित्रांनो🙏🏻
  मा.श्री नंदकुमार साहेबांच्या मार्गदर्शनाने  महाराष्ट्राच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमात प्रत्येक शिक्षक बांधव हा आपल्या कार्यक्षेत्रात कृतिशील राहून स्वतः ला झोकुन देत आहे याचा हलकासा प्रत्यय आज दि. ७/१०/२०१० रोजी नाशिक जिल्ह्यातील मनपा शाळेत पार पडलेल्या नवोपक्रम कार्यशाळेत आला.कार्यशाळेत बसलेल्या सर्वच बंधूभगिनींनी आपल्या कार्यात स्वतः ला झोकून दिले आहे असे त्यांच्या चर्चेवरून दिसत होते नक्कीच कौतुकास्पद आहे .
      आपल्याला इतक्या अडचणी असून देखील मिळालेल्या संधीचा योग्य फायदा घेत आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या योग्य दिशेने जात आहोत याचे स्पष्ट चित्र दिसत आहे .

🔺नवोपक्रम कार्यशाळा नाशिक🔺
        👉ठळक घडामोडी👈

👉आजच्या नवोपक्रम कार्यशाळेची सकाळचे सत्र उत्साहवर्धक वातावरणात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व डायटच्या प्राध्यापिका श्रीम लोहकरे मॅडम यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली संपन्न झाले .
श्रीम लोहकरे मॅडम च्या नवोपक्रमसंबंधीच्या सूचना अन मार्गदर्शन प्रत्येकाच्या मनात ऊत्साह,प्रेरणा  निर्माण करणाऱ्या ठरत होत्या.

👉नवोपक्रम कार्यशाळेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक लाभलेल्या श्रीम भारती पाटील मॅडम यांनी नवोपक्रमासंबंधीची सविस्तर  माहिती देत नवोपक्रम अहवाल लेखन करताना माहितीचा उपयोग होईल अन सादरीकरण करताना मार्गदर्शक ठरेल असे अमूल्य मार्गदर्शन करीत  उपस्थित सर्वांची मनं जिंकून घेतली.

👉नाशिक डायटचे प्राचार्य श्री बच्छाव सरांनी आपला किमती वेळ आमच्यासाठी देऊन शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन ते  नवनिर्मितीच्या नवोपक्रमाच्या कामाला लागतील असे अमूल्य मार्गदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .श्री बच्छाव सरांच्या नवोपक्रमच्या मार्गदर्शनातील प्रत्येक शब्द ना शब्द आमच्या ह्रदयावर घर करून बसत होता.

         अशा उत्साहवर्धक वातावरणात सकाळचे सत्र यशस्वीरित्या संपन्न झाला.

🔺दुपारच्या सत्र
    👉कार्यशाळेचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीम भारती पाटील मॅडम यांनी उर्वरित भाग पूर्ण करत नवोपक्रमाच्या  माहितीचा खजिना आमच्याकडे स्वाधीन केला.
     
👉 राज्यस्तरावर नवोपक्रमाचे पारितोषिक पटकावण्यार्या, त्यांच्या  कर्तृत्त्वाने सर्वाना हेवा वाटावा अशा नाशिक जिल्ह्यातील उपक्रमशील, कृतिशील शिक्षिका श्रीम गौरी पाटील यांनी पी पी टी च्या सहाय्याने नवोपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या यशस्वी अन उत्कृष्ट कार्यानुभवाच्या नवोपक्रमाचे सादरीकरण करत सर्वांना मंत्रमुग्ध करून सर्वांचे लक्षात वेधण्यात यशस्वी झाल्या , खरच गौरी मॅडमचा नवोपक्रम पाहून नवोपक्रमासाठी आम्हाला आत्मविश्वास निर्माण झाला.
आम्हा सर्वांना  नवोपक्रमाच्या वाटचालीसासाठी मार्गदर्शक म्हणून श्रीम गौरी पाटील मॅडम यांचा निश्चितच फायदा होणार आहे .
   श्रीम गौरी पाटील यांची नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक कार्यासाठी ची तळमळ पाहून आमच्या मनातही त्यांच्यासारखा नवीन उपक्रम करून आपल्या शाळेला पर्यायी जिल्ह्यातील सर्वांना त्याचा फायदा व्हावा यासाठीचा उत्साह संचारला होता.
गौरी पाटील यांनी नाशिक डायटच्या प्राचार्य अन प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आलेल्या नवोपक्रमशील शिक्षकांचा एक व्हाॅटस् अँप  गट तयार करून जिल्ह्यातील शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण खडा उचलण्याची जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ती येत्या दोन दिवसात पूर्ण करून एका महत्त्वपुर्ण गटाची स्थापना केली जाणार आहे .
ह्या गटाचे नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक वाटचालीत निश्चितच महत्त्वाचे योगदान राहणार आहे .

👉श्री अनिल माळी सरांचे आडनाव ऎकून मला शिक्षणातील महान तपस्वी अन यशस्वी गटशिक्षणाधिकारी श्री नामदेव माळी सरांची आठवण झाली.
श्री अनिल माळी सरांनी पक्षी संवर्धनाची दाखवलेली डाॅक्युमेंटरी खुप ह्रदयस्पर्शी ,मार्गदर्शक ,अन कौतुकास्पद  होती.
👉श्री प्रकाश चव्हाण सरांनी मार्गदर्शन अमूल्य होते.

👉सिन्नर तालुक्यातील श्री  खेडकर सरांच्या शाळेतील दप्तरमुक्त शाळेसाठी लाॅकर पद्धतीच्या उपक्रमाचे कौतुक करावे तितके कमीच आहे,त्यांनी अतिशय सहज आणि सोप्या शब्दात उपक्रम स्पष्ट करून सांगितला.
👉बर्याच बांधवांच्या नवोपक्रमासंबंधी शंकासमाधान तसेच चर्चाही झाली.

   👉सरतेशेवटी श्रीम सरिता मँडमने अध्यापन करताना रचलेल्या विषयातील घटकांच्या गीतांचे गोड आवाजात उत्कृष्ट गायन  करून सर्वांच्या मनावर राज्य केले,उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मॅडमचे अभिनंदन केले अन उत्कृष्टतेचा सन्मान देत समारोपासह कार्यशाळेची यशस्वी सांगता केली.
श्रीम सरिता मॅडम यांनी गायलेल्या गीतांना स्वरब्द्ध करून आपल्या www.dnyanvahak.blogspot.in च्या माध्यमातून  लवकरच सर्वांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
व्हाॅटस् अॅपवरील कधीही न भेटलेले पण कायम संपर्कात असणारे काही बांधव पाहून माझा आनंद व्दिगुणित झाला.

धन्यवाद 🙏🏻

No comments:

Post a Comment